Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी महाराज अभ्यासण्याची अनोखी संधी

chhatrapati shivaji-maharaj
, शुक्रवार, 18 जून 2021 (16:15 IST)
छत्रपती शिवाजी  महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वर्षाचा कोर्स सुरू करण्यात येत आहे. महत्वाची या अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग' असे आहे. 
 
महाराजांची 50 वर्षांची कारकिर्द विविध घटनांनी भरलेली आहे. याचा आढावा अनेक पुस्तकांतून मांडला आहे. यामध्ये महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे दिले जाणार आहे. या सगळ्याचे बारकावे अभ्यासक्रमात आहेत. हा अभ्यासक्रम दोन सहामाही सत्रांमध्ये विभागला आहे.  
प्रत्येक सत्रात चार विषय असे एकूण आठ विषयात अभ्यासक्रांची विभागणी केली आहे. प्रत्येक विषयाला चार क्रेडिट आणि शंभर गुण देण्यात आला आहे. एकूण 32 क्रेडिट आणि 800 गुणांचा अभ्यासक्रम आहे.
 
14 जूनपासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. चार जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. 
 
अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात शिकवले जाणार हे विषय 
युद्धशास्त्र व युद्धनीती 
नीतीकार, 
प्रॅक्टिकल कंपोनेंट एँड रिसर्च मेथडॉलॉजी
 
अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिकवले जाणार हे विषय 
शिवाजी महाराजांचे आरमार
प्रशासन
फील्ड व्हिजिट एँड प्रोजेक्ट रिपोर्ट

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड? राणे यांचा सवाल