Pradeep Sharma granted bail अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एस बोप्पना यांच्या अध्यक्षतेखालील बँचने हा जामीन मंजूर केला.
शर्मा यांनी पत्नीची प्रकृती ठीक नसून, तातडीची शस्त्रक्रिया करायची आहे, त्यासाठी जामीन मिळावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीच्या प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना दिलासा देत 3 आठवडय़ांसाठी जामीन मंजूर केला.
प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरासमोर कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच ठाण्यातील कार शॉप मालक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी शर्मा अटकेत आहेत.