Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

एलआयसी एजंटचा प्रताप, कोट्यवधींची सावकरी, पोलिसांनी केले तीन बँकेतील लॉकर सील

arrest
, गुरूवार, 2 जून 2022 (11:18 IST)
धुळे : धुळे शहरातील एका एलआयसी एजंटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हा एजंट सावकारी धंदा करत होता. त्याला कोट्यावधी रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्हातील अवैधपणे सावकारी करणाऱ्या सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
 
अवैधपणे सावकारी विरोधात धुळे पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. यातूनच सावकारातर्फे पिळवणूक होत असल्याची तक्रार आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. या तक्रारीबाबत पोलिसांनी पुढील तपास केला असता धुळे शहरातील राजेंद्र जीवनलाल बंब या खासगी सावकाराचे नाव उघडकीस आले आहे. या खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून संबंधित तक्रारदार व्यक्तीने आझादनगर पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे आझाद नगर पोलिसांनी बंब यांच्या घरी व आणखी एका ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात जवळपास कोट्यावधींची रोकडसह कोरे चेक त्याचबरोबर कोरे स्टॅम्प मिळाले. या स्टॅपवर सावकारी कर्ज घेणाऱ्यांच्या सह्या देखील घेण्यात आले आहेत. तसेच सोन्याचे दागिने देखील पोलिसांच्या हाती लागली आहे.
 
तीन बँकेतील लॉकर सील
खाजगी सावकाराचे शिरपूर पीपल्स बँक, जळगाव पीपल्स बँक व योगेश्वर पतपेढी याठिकाणी लॉकर आहे. पोलिसांनी हे लॉकर देखील सील केले आहेत. या लॉकरमधून देखील सावकारी कर्ज वाटप करताना जमा केलेली कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात या सावकार विरोधामध्ये आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
जप्त केलेला मुद्देमाल असा
एका जागी- एक कोटी ३० लाख १ हजार १५० रुपये रोकड. ४६ लाख २२ हजार ३७८ रुपयांचे ९७८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३८ कोरे चेक, सही केलेले ३३ कोरे स्टॅम्प, दहा सौदा पावत्या व ५९ खरेदीखत कागदपत्र.
दुसऱ्या जागी- बारा लाख नऊ हजार चारशे रुपयांची रोख रक्कम, ३ सौदा पावत्या, पंचेचाळीस खरेदी खताचे कागदपत्र

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईकारांसाठी खुशखबर! यंदा रेल्वे रूळ पाण्याखाली जाणार नाही