Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pratap Sonwane Passed Away वाढदिवशीच माजी खासदाराचे निधन

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (13:06 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शुक्रवारी प्रताप दादांचा 75 वा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मतदारसंघातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. 
 
प्रतापदादा जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रतापदादा सोनावणे सलग दोनवेळा निवडून आले होते. मतदारसंघ पूर्नरचनेत धुळे नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला असता या मतदारसंघातून 2009 मध्ये पहिल्यांदा ते विजयी झाले.
 
दादांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकांची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेचे अध्यक्ष व सभापती अशी पदे त्यांनी भूषवली होती.
 
प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाल्याचे मंत्री दादा भुसे म्हणाले. ते म्हणाले की प्रतापदादांनी कधीही सत्ता वा कसलाही मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला असल्याचे दादा भुसे म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख
Show comments