प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार यावेळी 384 सैनिक आणि जवानांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. यापैकी 12 जणांना शौर्य चक्र, 29 जणांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. याआधीही शौर्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या सैनिकांना हा पुरस्कार पुन्हा पदक म्हणून नव्हे तर बार म्हणून दिला जातो. देशातील 88 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे.