Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करा

Promote 10th-12th grade students without taking exams
, मंगळवार, 6 एप्रिल 2021 (18:18 IST)
शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
 
हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध असतील तर नागरिकांना त्या सुविधा मिळाल्या हव्यात. त्यांना राज्य सरकारकडून सोयीसुविधा मिळतात. हॉस्पिटल्सना जाणीव नसेल तर त्यांनी जाणीव करून देण्यात यावी.
 
राज्याच्या तिजोरीची स्थिती आपल्याला माहिती आहे. कोरोनाने समाजमन विचलित झालं आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
 
छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.
 
लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत. व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं.
 
अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं. सलून, ब्युटी पार्लरला आठवड्याला दोन ते तीन वेळा दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
 
सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली, मुंबईनंतर गुजरातमध्ये निर्बंध वाढणार? उच्च न्यायालयाने शनिवार व रविवार कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले