Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान ; महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव

Providing decorative honors at the hands of the President; Pride of five officers and jawans from Maharashtra राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान ; महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव  Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:15 IST)
तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख आणि राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि  समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी  कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.
परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक  
महाराष्ट्राचे सुपूत्र एअर मार्शल प्रदीप  बापट यांना परम  विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण  देशमुख ,एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस आणि  एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक  प्रदान  करण्यात आले.
कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नैतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवाद्यांना परतवून लावले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, तर काँग्रेसला २ जागा