Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

voting
, शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (15:09 IST)
महाराष्ट्रात २ डिसेंबर २०२५ रोजी काही भागांमध्ये होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणुकांसाठी सुट्टी जाहीर करण्याबाबत सामान्य नियम लागू करण्यात आले आहे. 
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ज्या दिवशी मतदान असते, त्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क व्यवस्थित बजावता यावा यासाठी संबंधित मतदारसंघामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. तसेच या सुट्टीमुळे सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि बहुतांश खाजगी आस्थापना बंद राहतात. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य, पोलीस, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते, परंतु त्यांना मतदानासाठी अर्ध्या दिवसाची सवलत (सुट्टी) किंवा ठराविक वेळेची परवानगी दिली जाते.
तसेच आता महाराष्ट्रात २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कारण नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची अंतिम मुदत वाढवली असून १ डिसेंबर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व उमेदवार मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचार करू शकतील.  
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई : पतीने एआयचा वापर करून बनावट रेल्वे तिकीट बनवले; पत्नीवर जीआरपीची कडक कारवाई