गडचिरोलीचे पालक मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यासोबतच त्याच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका पत्राद्वारे ही धमकी आली होती.
ही धमकी नक्षलवाद्यांकडून आली आहे. गृह विभागाने तातडीने पावले उचलत तपास सुरू केला आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.या संदर्भातची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिंदे यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत जीवे मारण्याची धमकीचे पत्र 7 दिवसा पूर्वी आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री आहे. त्यातील काहीसा भाग नक्षलग्रस्तांचा भाग आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिंदे यांनी मूलभूत सुविधा वाढवून अनेक विकास कामे केली. नक्षलवाद्यांनी बंद केलेले काही माईन प्रोजेक्ट देखील सुरु करण्यात आले आहे. या मुळे त्यांच्या वर नक्षलवाद्यांचा राग आहे. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. धमकीच्या पत्राबाबतची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या संबधीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.