Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे सातारा महामार्ग अपघाताने नव्हे तर महिलांच्या अश्लील हातवारे केल्याने आला चर्चेत !

Webdunia
सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (21:00 IST)
राज्यातील अनेक महामार्ग अपघातामुळे नेहमी चर्चेत येत असतात पण सध्या पुणे सातारा महामार्ग वेगळ्या घटनेने चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून खेडशिवापूरच्या काही भागात महिला चुकीचं काम करीत असल्याचं रस्त्याने जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या लोकांनी पोलिसांच्या निर्दशनास आणून आले. त्यानंतर खेडशिवापूर पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली होती. काही महिला तिथं असणाऱ्या लॉजच्यासमोर उभं राहून चुकीचं काम करीत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या महिलांना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असावा अशी शंका पोलिसांना आहे.
 
राज्यातील पुणे-सातारा महामार्गावर नेहमीच अपघाताने चर्चेत असतो पण सध्या याच महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत असलेल्या सेवा रस्त्यावर उभं राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर खेड शिवापूरच्या राजगड पोलिसांची कारवाई केली आहे. महामार्गावरील सेवा रस्त्यांशेजारी असणाऱ्या लॉजिंग समोरच्या सार्वजनिक ठिकाणी उभं राहून त्या महिला अश्लील हावभाव हातवारे करीत होत्या.

त्याचबरोबर जाणाऱ्या लोकांना वेश्या गमनास प्रवृत्त करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर कारवाई त्या महिलांवरती कारवाई करण्यात आली आहे. खेडशिवापूरच्या राजगड पोलिस स्टेशनमध्ये तिघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हायवे शेजारी असणाऱ्या सगळ्या लॉजची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी छापेमारी सुध्दा करणार आहेत. त्या महिलांसोबत आणखी काही महिला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चौकशीत अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख