आपले पाळीव प्राणी देखील आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. पुण्याच्या भोर तालुक्यात ब्राह्मणघर गावात एका शेतकऱ्याने पोटाच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या गायीच्या मृत्यू नंतर तिच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करत घरातील सदस्य प्रमाणेच तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढली.सदाशिव कुमकर असे या शेतकऱ्याचे नाव असून तिने एखाद्या कुटुंबाबतील सदस्यांच्या प्रमाणे आपल्या गायीचे बैलगाडीत मृतदेह ठेवले आणि गावातील ग्रामस्थ देखील तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तिच्या बैलगाडीच्या पुढे ग्रामस्थ भजन म्हणत होते. कुमकर कुटुंबीयांनी पाणावलेल्या डोळ्याने आपल्या लाडक्या गायीला शेवटचे निरोप दिले. गायीवरील प्रेम पाहून ग्रामस्थ देखील भारावून गेले होते.
कुमकर कुटुंबाने या गायीचा लहान बाळासारखा सांभाळ केला होता. या गायीचा मृत्यू चौदा पंधरा वर्षाची झाल्यावर झाला. तिच्या मृत्यूमुळे कुमकर कुटुंबाची रडून रडून अवस्था विकट झाली होती. तिच्या मृत्यू नंतर या गायीची अंत्ययात्रा बैलगाडीतून काढण्यात आली असून तिच्या मृतदेहावर वस्त्र टाकून तिचे पावित्र्य जपले होते. अंत्ययात्रा काढून झाल्यावर पाणावलेल्या आणि जड अंतकरणाने तिला शेतात पुरण्यात आले.