Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune : पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Webdunia
मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (11:09 IST)
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात काऱ्हाटीच्या कऱ्हा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम संतोष खंडागळे(20) असे या मृत तरुणाचे नाव असून हा संपूर्ण प्रकार त्याच्या आईच्या डोळ्यासमोर घडला. मयत शुभम आईच्या सह नदीवर कपडे धुण्यासाठी आला असता मित्रांसह नदीपात्रात पोहण्यासाठी गेला मात्र त्याला पाण्याच्या अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडू लागला.

त्याला बुडत असताना पाहून त्याच्या आईने आणि सोबतच्या मित्रांनी आरडा ओरड केला. त्यांचे  ओरडणे ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात उडी मारून त्याला बाहेर काढले. दुर्देवाने तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शुभम साताऱ्यात पोलीस भरती अकॅडमीत शिक्षण घेत होता. सुट्टी असल्यामुळे तो गावी घरी आला होता. तो एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील १२४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

Asian Legends League 2026 मध्ये भारताने पाकिस्तानला २ गडी राखून पराभूत केले

भारत सरकार विधवा महिलांना मासिक पेन्शन देते; अर्ज कसा करावा जाणून घ्या....

न पेट्रोल, न लाईट! थेट उन्हावर चालणारी स्कूटर लॉन्च; ६० किमीच्या रेंजसह जाणून घ्या किंमत

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप, भारत ३९ पदके जिंकला; पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले

पुढील लेख
Show comments