suvichar

विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये दहावीचा पेपर

Webdunia
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र विषयाची परीक्षा होती. कॉपीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी भरारी पथक सर्व केंद्रांवर पूर्ण लक्ष देऊन आहेत. मात्र भिवंडी येथील शाळेत शिस्तीला गालबोट लागले आहे. 
 
शाळेत परीक्षार्थी म्हणून आलेल्या तीन विद्यार्थीनींना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. काल्हेर येथील शेतकरी उन्नती मंडळाच्या परशराम धोंडु टावरे विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  पेपर सुरू  झाला  तरी तीन विद्यार्थीनी शाळेच्या बाहेर घुटमळत होत्या, तीन विद्यार्थीनी रिक्षात बसलेल्या आढळल्या. पेपरला सुरुवात झाली तरी परिक्षा केंद्रात येत नाही हे पाहून शिक्षिका विद्या पाटील यांना त्यांच्यावर संशय आला. शिक्षिका पाटील यांनी त्या संशयित विद्यार्थिनींची तपासणी  केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये टॉपर्स ग्रूप या नावाने प्रश्नपत्रिका आढळून आली आहे. तपासणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा तोच प्रकार आढळून आला आहे . राहनाळ येथील होली मेरी काँन्व्हेंट शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या या विद्यार्थीनी आहेत. या गंभीर प्रकरणी आता पोलिस चौकशी सुरु झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

LIVE: रोहित पवार यांनी तुकाराम मुंडे यांना निवेदन देत परीक्षा रद्द करण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका कधी सुरू होईल? संपूर्ण वेळापत्रक पहा

किसान कर्जमुक्ती योजना २०२६ च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, भंडारा जिल्ह्यातील २२,३६५ शेतकरी पात्र

दिल्ली आणि महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

रोहित पवार यांचे तुकाराम मुंडे यांना निवेदन; पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments