Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांवर उधळला भंडारा

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांवर उधळला भंडारा
, शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (11:38 IST)
Vikhe Patil : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे धनगर कृती समितीचा कार्यकर्ता शंकर बंगाळे यांनी त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहावर थांबला होता. त्यानंतर त्यांनी भेटण्याची विनंती केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना भेटायला बोलवले होते.   त्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या सुरक्षारक्षकांनी शंकर बंगाळे यांना लाथ्याबुक्यांनी मारहाण करत त्याला ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar arkashan) मुद्दा प्रचंड गाजतो आहे. त्यावेळी हा सारा प्रकार घडला आहे. 
 
अध्यादेशानंतर हा मुद्दा
राज्यात सध्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा अध्यादेश काढण्यात आला. मात्र त्यावरही जरांगे पाटील यांनी आक्षेप घेत त्यात काही दुरुस्ती सुचवल्या आहेत. एकीकडे हे प्रकरण तापले असतानाचा धनगर आरक्षणाचा मुद्याही गाजतो आहे.
 
यावेळी शंकर बंगाळे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षण संदर्भात निवेदनही दिले, हे निवेदन पाहत असतानाच शंकर बंगाळे यांनी खिशातून भंडारा काढून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळला. त्यावेळी सुरक्षारक्षकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर बंगाळे यांना मंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळल्याने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Redmi चा अप्रतिम स्वस्त फोन आज पुन्हा विक्रीसाठी आहे