Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राफेलच भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही : शरद पवार

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (09:23 IST)
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी-रिपाई (गवई) गट, शेकाप व सीपीएमसह मित्रपक्षांच्या महाआघाडीची विराट संयुक्त प्रचारसभा आज सायंकाळी नांदेडच्या गोकुळनगर येथील इंदिरा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे सहप्रभारी संपत कुमार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री बस्वराज पाटील, माणिकराव ठाकरे, जयप्रकाश दांडेगावकर, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आ.डी.पी.सावंत, आ.अमिताताई चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, आ.वसंतराव चव्हाण, आ.प्रदीप नाईक, फौजीया खान, शंकरअण्णा धोंडगे, रामराव वडकुते, बापुसाहेब गोरठेकर, नरेंद्र चव्हाण यांच्यासह महाआघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.
 
सभेला संबोधित करताना पवार म्हणाले, राफेल विमानाची किंमत 500 कोटीहून 1600 कोटीवर नेली. राफेलचे हे भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही.यावेळी पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे. अशा संकटाच्यावेळी मतभेद विसरून आम्ही एकीचे दर्शन घडवतो असा लौकीक आहे. परंतु गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी व बैठकीस उपस्थित न राहता धुळे, यवतमाळ येथे प्रचारसभेत गुंतले होते. नोटबंदी नंतर दहशतवादी हल्ले कमी होतील असा दावा करण्यात येत होता. मात्र हल्ल्यात वाढ झाली आहे. लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच नाही तर जगाचा भुगोलही बदलला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, ओळखीच्या व्यक्तीवर खुनाचा संशय

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

महिलेची हत्या, मृतदेहाचे 30 हून अधिक तुकडे फ्रिज मध्ये आढळले

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments