Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकणात जोरदार पाऊस, रत्नागिरी जगबुडी नदीला पूर, रस्ता पूर्ण बंद

rain in kokan
, शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:39 IST)
मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खेडमधील नारिंगी आणि जगबुडी पुलावरुन पाणी गेले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली. जगबुडीच्या पाण्याची पातळी आठ मीटरच्यावर असून, रात्री उशिरापर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे  दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अपघात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.  
 
रायगडमध्ये दासगावमध्ये दरड कोसळून महामार्ग सुमारे सात तास ठप्प होता. त्यात आता भर म्हणून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केली आहे. त्यामुळे धीम्या गतीने होणारी महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. पावसाचा जोर वाढत गेल्याने खेड पोलिसांकडून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केला आहे. अगदी काही काळ  एक-एक वाहन सोडण्यात येत होते. नदीत पाणी वाढल्याने पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. एसटी बसच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात किवा जवळपास जाणे सध्या टाळलेले गरजेचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावधान : आता व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये राहणार पोलिस