Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबईत पावसाचा जोर, पुढील दोन दिवस झमाझम

मुंबईत पावसाचा जोर, पुढील दोन दिवस झमाझम
मुंबई - पहिला पाऊसच मुंबई शहर आणि उपनगरासाठी अनेक तक्रारी घेऊन येणार ठरला. शुक्रवारी पहिल्याच पावसाने झोडपले आणि पुढील दोन दिवसही मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. मागील एक दिवसापासून कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही 
 
ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
 
या पावसामुळे अनेक तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहे ज्यात मुंबई शहरात आणि उपनगरात 6 ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. आपत्कालीन 
 
नियंत्रण कक्षाहून प्राप्त माहितीनुसार 50 हून अधिक ठिकाणी झाडे कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक रस्ते तसेच बाजार पाण्याने तुंबले आहेत.
 
तसेच पहिल्या पावसातच लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाचा रुळावर पाणी साचणार नाही हा दावा मात्र पहिल्याच पावसाने खोटा ठरविला आहे. रेल्वे मार्गात पाणी साचू नये म्हणून 
 
पंप मशीन बसविण्याची तरतूद केली असली तरी काही गाड्या ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर लोकल 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. 
 
सतत होत असलेल्या पावासामुळे अनेक जागी गुडघ्यांपर्यंत पाणी साचले आहे. वाहनांची गतीला ब्रेक लागले आहेत त्यामुळे ट्रॅफिक विस्कटलं आहे. जेथे-तेथे जाम लागत असल्यामुळे लोकं खोळंबून राहिले आहेत. पश्चिमी उपनगरात दोन वेगवेगळ्या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाम NRC : भारताला नकोसे झालेले लोक आत्महत्या करायला प्रवृत्त झाले आहेत?