Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rain Update : मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पाऊस, या भागात यलो अलर्ट

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (11:30 IST)
राज्यातील विविध भागात मुसळधार सरी  कोसळत आहे. मान्सून परतीच्या प्रवासावर आहे. मुंबई, आणि नवी मुंबई सह उपनगरात मुसळधार पाऊसने हजेरी लावली.अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. अनेक जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्यानं आज आणि उद्या मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान खात्याकडून मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईकरांना काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, सातारा,सांगली, आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments