राज्यात पुढील 4 दिवसांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचा प्रवास लांबला असला तरीही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि गोवा पट्टय़ात 28 मेपर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील.
यासोबतच हवामान खात्याने सांगितले आहे की, पाऊस अरबी समुद्रात आला आणि तिथेच अडकून पडला. प्रतिकूल स्थितीमुळे मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात थांबला असून मान्सूनचे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात पुढील तीन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.