suvichar

राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा

Webdunia
बुधवार, 25 मे 2022 (15:09 IST)
राज्यात पुढील 4 दिवसांत पावसाचा  इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचा प्रवास लांबला असला तरीही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत.
 
हवामान खात्याने  दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि गोवा पट्टय़ात 28 मेपर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र  आणि मुंबई  परिसरात हे वारे पोहोचतील.
 
यासोबतच हवामान खात्याने सांगितले आहे की, पाऊस अरबी समुद्रात आला आणि तिथेच अडकून पडला. प्रतिकूल स्थितीमुळे मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात थांबला असून मान्सूनचे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
राज्यात पुढील तीन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

महिलांच्या स्पेशल टूरमध्ये पुरुषांची एन्ट्री; ग्राहक मंचाचा दणका, ट्रॅव्हल कंपनीला दंड

फ्लिपकार्टवरून फोन मागवला, पार्सलमध्ये सापडले 'बिअर्ड ऑईल'; आता मिळणार १.८ लाख रुपये

526 किमीच्या लांब पल्ल्यासह आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह किया सिरोस ईव्ही भारतात लॉन्च

LIVE: पालघर पुरात एकाचा मृत्यू, १६ गावांचा संपर्क तुटला

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड8 सिरीज एआय, 5000 एमएएच बॅटरी आणि नवीन वैशिष्ट्यां सह लॉंच

पुढील लेख
Show comments