Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (17:55 IST)
राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला असून, 2 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होत आहे.
 
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणखी तीन-चार दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागांतच पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरपासून मात्र या भागातही विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
 
कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद,बीड,लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Edited By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पुढील लेख
Show comments