Marathi Biodata Maker
✕

राज्याच्या या भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (07:24 IST)
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्य कडाक्याच्या उष्ण लाटेतून जात आहे. त्यामुळेच अनेक शहरांमध्ये ४४ अंशांच्याही पुढे तपमान गेले आहे. परिणाम कडक ऊन आणि घामाने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता राज्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, येत्या ३ आणि ४ मे रोजी विजांच्या कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार आहे. खासकरुन पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

गडचिरोलीत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कापड व्यापाऱ्यांना चर्चेसाठी आपल्या कार्यालयात आमंत्रित केले

Maruti 800 ने इतिहास घडवला, हा विशेष पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली कार ठरली

राज्यात १२ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय एकट्याने लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरण्यास सक्त मनाई

अक्कलकोटमध्ये एफडीएचा मोठा छापा; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, चार दुकानांना टाळे

पुढील लेख
Show comments