Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात पाऊस, जनजीवन विस्कळीत, शेतकरी संकटात

Webdunia
सोमवार, 14 डिसेंबर 2020 (16:32 IST)
मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. 
 
मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. धुळे, जळगावमध्ये दाट धुकं आहे. पुणे जिल्ह्यातही आंबेगाव तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे.
 
रायगड जिल्ह्यात सकाळपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. अलिबाग, माणगाव आणि रोहा तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. तर महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पेण परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments