Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यासह या 10 जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन,मुसळधार पावसाची शक्यता

Rains return to these 10 districts including Pune
, रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (13:12 IST)
येत्या पुढील दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर असण्याची शक्यता  आहे. 
अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होऊ शकतं. कमी दाबाच्या क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून लांब असल्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा,सांगली, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना यलो अलर्ट सांगण्यात आले आहे. पुढील काही तास ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता सांगितली आहे .या मुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्यास सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी