Marathi Biodata Maker
✕

राज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट

Webdunia
मंगळवार, 30 मे 2023 (08:05 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
 
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर शाब्दिक युद्ध रंगलेले महाराष्ट्राने पाहिले होते. राज ठाकरे यांनी कर्नाटक निकालातून जनतेला गृहित न धरण्याचा बोध घेण्याचा सल्ला भाजपला दिला होता. त्यावरुन फडणवीस यांनी बाहेरच्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, असे राज यांना सुनावले होते. नाशिक जिल्हा दत्तक घेण्याचे विधान फडणवीसांनी २०१७ मध्ये केले होते. त्याची आठवण राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत पत्रकारांना करुन दिली होती. नाशिक दत्तक घेणारे आता कुठे आहेत? असा सवाल करत राज यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला होता. या शाब्दिक वादानंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट आहे.

भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी
भारतीय जनता पक्ष सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यानिमित्ताने भाजपचे मुंबईत विविध कार्यक्रम होत आहेत. सोमवार दुपारी सव्वा बारा वाजता भाजपचा मुंबई महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, उपमुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, महासंपर्क अभियान प्रमुख प्रवीण दरेकर उपस्थित होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

कार्तिकी मेळ्यासाठी पंढरपूरकरिता रेल्वेने मोठी व्यवस्था केली; मध्य रेल्वे ३६ विशेष गाड्या चालवणार

एक ज्येष्ठ खासदार, अशी वक्तव्ये करू शकत नाही; संजय राऊत यांना अवमान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा नाकारला

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे पाऊल: सर्व आमदारांनी दिला एका महिन्याचा पगार

पुढील लेख
Show comments