Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांचा फोन आला, खुद्द शरद पवार यांनीच दिली माहिती

Raj Thackeray's
, शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:27 IST)
वाढीव वीज बिलाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवेळी याप्रकरणी तुम्ही शरद पवारांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला होता. राज्यपालांच्या या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून वाढीव वीज बिलांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली आहे. 
 
याबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की, राज ठाकरे यांचा मला फोन आला होता. मात्र भेटण्याबाबत ठरलेले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. राज्यपालांनी फोन करायला सांगितल्याने मी फोन केल्याचं राज ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

4 जी मोबाइल फोन खरेदीसाठी कर्ज देऊन Airtelने खास ऑफर आणली