Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खड्डेच बघण्यासाठी चांद्रयान 3 चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात सोडलं असतं

Raj Thackeray Speech In Panvel
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत पनवेलमधील भाषणाला सुरूवात केली. भाषणात त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवर लक्ष वेधत म्हटले की चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवल्याने त्याचा आपल्याला काय उपयोग? चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं तर खर्च वाचला असता. असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टीका केली.
 
पनवेल शहरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जेथे बोलत असताना राज ठाकरे यांनी गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था यावर जोरदार टीका केली.
 
राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी जनतेला प्रश्न विचारला की राज्यातील सर्वच पक्षांनी तुमचा भ्रमनिरास केला तरी तुम्ही त्यांना परत कशाला मतदान करता?
 
त्यांनी म्हटले की अनेक लोक राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष बदलत असल्याचं सांगतात अरे पण कशाला खोटं बोलताय?, असा म्हणत राज ठाकरेंनी दलबदलूंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की सत्ताधारी पक्षाने दुसऱ्या पक्षांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष वाढवून दाखवावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋषभ पंत 220 दिवसांनंतर मैदानात परतला