राज ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर
राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यातील विदर्भ दौऱ्यासाठी मनसेने खास मास्टरप्लॅन तयार केल्याचे समजते.
राज ठाकरे हे १३ सप्टेंबरला नागपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. त्यात राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नाशिक प्रमाणेच आता विदर्भातही पक्षवाढीवर भर दिला आहे.
विदर्भात शिवसेनेचा मतदार हा सहजासहजी भाजपाला मतदान करणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेवर नाराज असलेल्या मतदाराला मनसेकडे वळवण्याचा राज ठाकरेंना प्रयत्न आहे. त्याशिवाय, भाजापाचे अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मनसे आण भाजपा युतीच्या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाणा आले आहे.