Marathi Biodata Maker

राज ठाकरे घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (11:54 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे ‘वर्षा’बंगल्यावर भेट घेणार आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील. त्यामुळे आजची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.
 
२८ ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. आधीपासूनच फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने यानंतर मात्र आक्रमक रुप धारण केले.
 
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधातील आपले आंदोलन आणखी तीव्र केले. मुंबई असो वा नवी मुंबई किंवा ठाणे, या प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनं केली. यामध्ये अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलंही उचलली. एकंदरीतच फेरीवाला आंदोलनाने गेल्या काही दिवसात मोठं रुप धारण केलं आहे.
 
मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील अनेक रस्त्यांनी, रेल्वे स्थानकांबाहेरील जागांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मनसेच्या आंदोलनांना पाठिंबाही वाढत गेला. त्यात काल  (1 नोव्हेंबर) काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा रोखला. मात्र त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले

पूजेच्या नावाखाली क्रूरता! नाशिकच्या ज्योतिषशास्त्राचे काळे सत्य, ५८ व्हिडिओंमधून उघड

ज्योतिष अशोक खरातच्या विरोधात 3 एफआयआर दाखल, एसआयटी स्थापन केले

नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ४१ हेक्टर पिकांचे नुकसान

मृत रुग्णावर ८ वर्षे उपचार करण्यात आले! बीड रुग्णालयातील प्रकार

पुढील लेख
Show comments