Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शेतकरी वर्गाच्या तोंडाला पुसली पाने, फसवा अर्थसंकल्प - राजू शेट्टी

शेतकरी वर्गाच्या तोंडाला पुसली पाने, फसवा अर्थसंकल्प  - राजू शेट्टी
, शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (09:02 IST)

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी वार्षिक बजेटवर जोरदार टीका केली आहे. सरकारने फसवणूक करत  सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. देशात आज भाजप सरकारबद्दल सर्वाधिक नाराज असलेला वर्ग हा शेतकरी असून  देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे  आता  शेतकरी वर्ग संघटीत झाला आहे. मात्र आता आपली २०१९ ला काही धडगत नाही. असे वाटल्याने भाजप सरकारने या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आम्ही भरपूर काही दिल्याचे चित्र दाखवले असून मात्र  ते सर्वच पूर्ण  खोटे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या हंगामात रब्बी पिकांना आम्ही दीडपट हमीभाव दिल्याचे सभागृहात सांगितले. पण, मंत्री जेटली किंवा कृषीमूल्य आयोगाने कुठल्या शेतकºयाला हा दीडपट हमीभाव दिला हे सिद्ध करुन दाखवावे. अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. 

कुठल्याच पिकाला अजूनही हमीभाव मिळत नाही आणि सरकार मात्र, तो वाढवून देण्याच्या गप्पा करतय , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये हमीभाव दीडपट करण्याची घोषणा केली मात्र गेली चार वर्षे त्याबद्दल सरकारने काहीच केले नाही कोणतेही पाऊल उचलले नाही. आमत्र आता निवडणुका समोर दिसू लागल्या असून त्यामुळे  सरकारला शेतकºयांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुमारे ७३ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. भाजप सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करुन १ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असती, तर त्यातून शेतकºयांना काही दिलासा मिळाला असता असेही शेट्टी यांनी सांगितले आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदोर येथील भाविकास नाशिकमध्ये जबर मारहाण