Dharma Sangrah

राम कदम यांच्या विरोधात पोलिस तक्रार घ्या राष्ट्रवादीचे आंदोलन

Webdunia
गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (17:20 IST)
राम कदम यांच्या संतापजनक विधानाचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज घेतला. एवढंच नाही तर राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर येथील चिरागनगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून घ्यावा म्हणून सुमारे १० तास ठिय्या आंदोलन केले. काही कार्यकर्ते रात्रभर या पोलिस ठाण्यात थांबणार असून जर एफआयआर नोंदवून नाही घेतला तर उद्या दुपारपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असं आमदार विद्याताई चव्हाण यांनी पोलिसांना निक्षून सांगितलं. त्याचप्रमाणे महिलांचा अवमान करणाऱ्या या संतापजनक वक्तव्याविरोधात न्यायालयातही दाद मागणार असल्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला.
 
या निषेध मोर्चात मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनीषा तुपे, जिल्हाध्यक्षा - पुष्पां हरियन, डॉ सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकिश शेख, डॉ रीना मोकल, स्वाती माने,मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले, अल्पसंख्यानक मुंबई अध्यक्ष सुहेल सुबेदार, अन्वर दळवी, सुरेश भालेराव व असंख्या पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ओटीमध्ये होणार होते ऑपरेशन; मुंबई रेल्वे रुग्णालयात महिला डॉक्टरचा संशयास्पद मृतदेह आढळला

एलपीजी संकट: मुंबईकरांच्या नाश्त्याची हेळसाण, वडा पाव, समोसा आणि इडली-डोसा स्टॉल बंद

आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांब रांगा

LIVE: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा दुहेरी इशारा

बुलढाणा : लोणार सरोवराची पाणी पातळी लक्षणीयरीत्या वाढली; मंदिरे पाण्याखाली गेली

पुढील लेख
Show comments