Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राम शिंदे विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

राम शिंदे विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
सगळा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. अशा अवस्थेत शेती करणे तर सोडून द्या, शेतकर्‍यांना आपले पश्धन सांभाळणेही कठीण झाले आहे. आधी चारा छावण्या सुरु करण्याची घोषणा करणार्‍या सरकारने नंतर चार्‍याचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकण्याची घोषणा केली. नंतर याच सरकारचे प्रतिनिधी मंत्री राम शिंदे यांनी अदभूत उपाय सुचविला. जनावरे सांभाळता येत नसतील तर पाहुण्यांकडे सांभाळायला द्या असे वक्तव्य करुन घायकुतीला आलेल्या शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. याचा अर्थ असा की शेतकर्‍यांना पशुधन सांभाळण्यासाठी सरकार कसलीच मदत करणार नाही! यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी आज शिवाजी चौकात राम शिंदे यांच्या प्रतिमेला जाहीरपणे जोडे मारले. राम शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी केली.
 
यावेळी नामदेव चाळक, संतोष सोमवंशी, महिला संघटक सुनीता चाळक, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख शंकर रांजणकर, विष्णु साबदे, महानगर प्रमुख, विधानसभा संघटक ॲड. नरेश कुलकर्णी, शहर प्रमुख रमेश माळी, बालाजी जाधव, महानगर संघटक योगेश स्वामी, उप शहरप्रमूख राहूल रोडे, शिवराज मूळावकर, राजेंद्र कत्तारे, सुधाकर कूलकर्णी, भारतीय कामगार सेना अध्यक्ष विशाल माने, वैभव बिराजदार, सुनील पवार, सुनील सोमवंशी, दिपक आपरे, सूरज झुंजे पाटील, दिनेश जावळे, अक्षय चवळे, अभिजीत गायकवाड यांच्यासह अनेकजण हजर होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री सक्षमपणे चालवत नाहीत - सुप्रिया सुळे