Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात 46 वर्षीय महिलेवर बलात्कार

Rape in Pune
पिंपरी- वैद्यकीय उपचारासाठी जामखेडहून मुलीकडे आलेल्या ४६ वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली. चिखलीतील म्हेत्रेवस्ती येथील भीमशक्तीनगर येथे हि घटना घडली असून यासंबंधी निगडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय जयभीम भीका भालेराव अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर याआधीही विनयभंग, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. 
 
रात्री घरात कोणी नसताना महिला औषध घेवून झोपली असता आरोपीने एकटेपणाचा फायदा घेत घरात घुसून महिलेवर अत्याचार केले. 
 
ही घटना शेजार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, 7 ठार