Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उसतोड कामगार महिलेवर बलात्कार; पतीला दिली पत्नीनेच साथ..

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2023 (21:43 IST)
जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ऊस तोडणी कामगार महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे हे दुष्कृत्य होत असताना कोणालाही कळू नये म्हणून या नाराधामची पत्नीच घराबाहेर राखणदार राहिली. ही धक्कादायक घटना जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण खु. या गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगव्हाण खु. या गावात एका ठिकाणी उसतोडणी सुरु होती. तिथे जालना शहरातील काही उसतोड कामगार आले होते. त्यात एक २१ वर्षीय विवाहित महिला होती. ऊसतोडणीचे काम सुरु असलेल्या परिसरातच राम भगवान जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा राम जाधव हे राहत होते.
 
दरम्यान, भगवान जाधवची पत्नी वर्षा हिची त्या उसतोड कामगारांसोबत ओळख झाली. त्यात त्या २१ वर्षीय महिलेशी अधिक ओळख झाली होती. त्या ओळखीतूनच शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वर्षाहिने त्या ठिकाणी कुणी नसताना पीडित २१ वर्षीय महिलेस आपल्या घरात पाठवले आणि बाहेरून दार बंद करत दारावर पहारा देत उभी राहिली.
 
आत भगवान दबा करून बसलेलाच होता त्याचा डाव साध्य करण्यासाठी. आणि भगवानने त्याचा डाव साधला. महिलेवर भगवानने बलात्कार केला. त्यानंतर महिलेला धमकी देण्यात आली याची कुठेही वाच्यता करू नको. मात्र महिलेले तडक पोलीस ठाणे गाठत आपबीती सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments