Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मच्छिमाराच्या गळाला दुर्मिळ मासे, मिळाली मोठी किंमत

मच्छिमाराच्या गळाला दुर्मिळ मासे, मिळाली मोठी किंमत
उजनी पाणलोट क्षेत्रात पळसदेव भागात दोन वेगवेगळ्या मच्छिमारांना दुर्मीळ असे आहेर जातीचे दोन मासे सापडले आहेत. त्‍यातील एक मासा 8 किलो वजनाचा आहे. त्या माशाला भिगवण मासळी बाजारातील अंबिका मच्छी मार्केटवर लिलाव बोलीतून प्रतिकिलो 1500 प्रमाणे ग्राहकाने खरेदी केला. 
 
बळी केवटे या मच्छिमाराला त्या एक माश्याचे 12000 रूपये मिळाले, तर दुसरा मासा 7 किलो वजनाचा भरला. त्याला 1300 रूपये प्रतिकिलो भाव मिळाला. राजू कट्टे यास त्याचे 9,100 रूपये मिळाले. आपल्या देशात आहेर मासा  नद्या, धरणे, तलावातून अतिशय दुर्मीळ होत चाललेला मासा आहे. त्याच्यात विविध औषधी गुणधर्म असल्याने देश-विदेशातून या माशाला मोठी मागणी आहे. हा मासा दिसायला अगदी सापाप्रमाणे दिसतो..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजब दावा, खेकड्यांनी भोकं पाडल्याने तिवरे धरण फुटलं