Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अलिबागला तसली अश्लील पार्टी, एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसह 10 मुली, 4 ब्रोकर आणि 4 वाहनचालकांना अटक

अलिबागला तसली अश्लील पार्टी, एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसह 10 मुली, 4 ब्रोकर आणि 4 वाहनचालकांना अटक
, शनिवार, 29 जून 2019 (08:44 IST)
रायगड जिल्ह्यातील असलेले समुद्रकिनारी वसलेले अलिबाग सध्या बदनाम होते आहे. या ठिकाणी पर्यटन करण्याच्या नावावर अवैध कामं करण्यासाठी गेलेल्या 11 जणांना अलिबाग पोलिसांनी पकडले आहे. अलिबागम येथील किहीम परिसरातील बंगल्यावर धाड टाकत मुली पुरवणाऱ्या दलालांसह 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अनेक टीव्ही कलाकारांचा यामध्सये मावेश आहे. मात्र पोलिसांनी त्नायांची नवे उघड करण्यास  नकार दिली आहे. मात्र यामध्ये अनेक प्रसिद्ध नावं आहेत.एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसह 10 मुली, 4 ब्रोकर आणि 4 वाहनचालकांना अटक करण्यात आली आहे. बर्थ डे पार्टीच्या नावाखाली मुलींनी आणून वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. बनावट ग्राहकाने या ठिकाणी जाऊन एजंटकडे रक्कम दिली व मुलगी ताब्यात घेतली. त्या मुलीला खासगीत रुममध्ये नेल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना मिस कॉल दिला आणि पोलिसांनी बंगल्यात धाड टाकली आहे. बंगल्यात धाड टाकताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता तरुणींकडे कोकेन सापडले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली. सात पीडित युवतींना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. राखी नोटानी, रंजिता सिंग उर्फ रेणू, राजकमल, निकेश मोदी, वरूण अदलखाँ, सईद अमीर रज्जाक, मिगा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांच्याविरूध्द मांडवा पोलिस ठाण्यात गुरनं 29/2019 प्रमाणे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5,6 सह भादंवि कलम 370 (1) (ब) याच्यासह एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलम 8 (क), 22,27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.अटक केलेल्यांपैकी तसेच सुटका करण्यात आलेल्या काही युवतींचे बॉलिवूड आणि छोट्या पडद्याशी देखील कनेक्शन असल्याचे समजते. या तथाकथित आणि हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोणा-कोणाचा समावेश आहे, मुंबईतून हे सेक्स आणि ड्रग्ज रॅकेट कोण चालवत होते, याचा रायगड पोलिस तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत सांगलीत हळदीच्या खरेदी-विक्रीचा केंद्र