Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, 11 वी प्रवेशासंदर्भात महत्वाची बातमी

Webdunia
मंगळवार, 27 जुलै 2021 (23:33 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इ. 11 वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन करण्यता येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि.20 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वा. पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि. दि.21 जुलै 2021 पासून बंद ठेवण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.10वी ) परीक्षा सन 2021 साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी, इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची आवदेनपत्रे सोमवार दि.26 जुलै 2021 रोजी दुपारी 3.00 पासून ऑनलाईन पध्दतीने https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा पुन:श्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सुविधा दि.02 ऑगस्ट 2021 अखेर (रात्री 11.59) अखेर उपलब्ध असेल. मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
 
20 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल. सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करु न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी खालील माहिती नोंदवावी लागणार आहे, ई-मेल आयडी उपलब्ध असल्यास, पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे, परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्यांने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल, तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल ) या विषयासाठी विद्यार्थ्यांस एक माध्यम निश्चित करावे लागेल, सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांस त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवास्थानच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी जिल्हा व तालुका/ शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल, ज्या विद्यार्थ्यांनी इ.10 वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल, उपरोक्त प्रथम आवश्यक माहिती निश्चित करुन ठेवावी व तद्नंतर इ.11 वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी.
सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी ) परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळाचे विद्यार्थी यांनी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार दि. 28 जुलै 2021 रोजी दुपारी 3.00 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबतच्या तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments