Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट
, शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (18:25 IST)
एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे.’
 
उर्मिला मातोंडकर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
 
राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती रिव्हरफ्रंटला पोहोचले, 30 मिनिटांत 200 किमी अंतर