राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे.भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
"पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाच्या मध्य-उष्णकटिबंधीय पातळीपर्यंत पसरलेल्या चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्र प्रदेशातील हवामानात बदल होत आहेत. मात्र, सध्या मध्य महाराष्ट्र आणि कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली असून 26 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पाऊस पडू शकतो. पुढील चार दिवस सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.