जून महिन्याच्या पहिला आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती, परंतु तसं काही झालं नाही. त्यानंतर नव्या सरकारला एक वर्ष पूर्ण होण्याच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा रंगू लागली. परंतु त्या चर्चादेखील फोल ठरल्या आहेत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जनतेसह भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षातील अनेक इच्छूक आमदारांना प्रतीक्षा आहे. परंतु त्या दृष्टीने पावलं उचलेली दिसत नाहीत.
मुनगंटीवार म्हणाले, साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं बोललं जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. त्यावर मुनगंटीवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले, साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला निश्चितपणे माहिती देतील. यासंदर्भात मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि तो माझा अधिकार ही नाही.
Edited By - Ratnadeep ranshoor