Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

रेखा जरे हत्याकांड : मुलाने केले धक्कादायक आरोप म्हणाला ते पैसे

रेखा जरे हत्याकांड : मुलाने केले धक्कादायक आरोप म्हणाला ते पैसे
, बुधवार, 14 जुलै 2021 (08:20 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येमागे पत्रकार बाळ बोठेसह काही भ्रष्ट शासकिय अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी मुख्यमंत्रयांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.

येत्या १५ दिवसांत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा जरे यांनीं दिला आहे. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या रेखा जरे संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करीत होत्या.
विविध शासकिय कार्यालयातील गैरकारभारांना आळा घालीत भ्रष्ट्राचाराविरोधात लढा देत होत्या.

समाजकार्याच्या माध्यमातून जरे यांची कार्यकारी संपादक बाळ बोठे याच्याशी ओळख होऊन त्यांच्यात मैत्री झाली होती.जरे या शासकिय कार्यालयांमधील भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवित असल्याचे पाहून बोठे याने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट्राचाराविरोधात जरे यांच्या लेटरपॅडवर निवेदने सादर केली होती. ही निवेदने देण्यात आल्यानंतर बोेठे त्यासंदर्भातील बातमी मोठी प्रसिद्ध करीत अधिका-यांना धमकावित असे.


बोठे सबंधित अधिकाऱ्यांना रेखा जरे यांची भिती घालीत असे. त्यामुळे अधिकारी घाबरून बोठे याच्याशी आर्थिक तडजोड करीत असत. रेखा जरे यांच्या हत्येनंतरच्या चर्चेतून व चौकशीतून या गोष्टी उघड झाल्याचे रूणाल यांनी या निवेदनात नमुद केले आहे. दि. ३० नोहेंबर रोजी मारेकऱ्यांकडून जातेगाव घाटात जरे यांची हत्या करण्यात आली.

पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा सुक्ष्म तपास करण्यात येऊन सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले. बाळ बोठेकडून सुपारी घेउन हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले.त्यानुसार या आरोपीं विरोधात दोषारोपत्रही दाखल झाले. घटनेनंतर फरार झालेल्या बाळ बोठेलाही पोलिसांनी अतिशय मेहनतीने जेरबंद केले.


तपासादरम्यान बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे कबूल करीत जरे या आपली बदनामी करतील या भितीने हत्या केल्याचेही त्याने सांगितले. बोठे मोठया दैनिकात कार्यकारी संपादक होता. तो सतत वेगवेगळया कार्यालयांतील भ्रष्ट्राचार उघडकीस आणून त्यांना धमकाऊन खंडणी उकळत असे.

रेखा जरे यांच्या हत्येसाठी १२ लाखांची सुपारी दिल्याचे त्याने कबुल केलेे आहे. परंतू सुपारीची रक्कम कोणी दिली ? का दिली ? याचा तपास अद्यापही बाकी आहे. ते दोषारोपपत्रामध्ये स्पष्टपणे दिसते आहे. या अनुषंगाने रूणाल जरे हे सतत चौकशी करीत माहीती घेत आहेत.


आईसोबत वेळोवेळी यासंदर्भात आपली चर्चाही होत असल्याचे नमुद करून या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, यासंदर्भातील काही कागदपत्रे आपल्या हाती लागली असून बाळ बोठे याने ज्या अधिकाऱ्यांविरोधात रेखा जरे यांच्या लेटरहेडवर निवेदने दिली.

त्यासंदर्भातील मोठया बातम्या प्रसिद्ध केल्या व त्या अधिकाऱ्यांनी बोठे यास पैसे देऊन रेखा जरे यांना गप्प बसविण्यास सांगितले. मात्र जरे यांनी गप्प न बसता सदर प्रकरणांचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्याच अधिकाऱ्यांकडून पैसे घेउन बाळ बोठे याने आईच्या हत्येची सुपारी दिली असावी असा संशय रूणाल यांनी व्यक्त केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्यथा दर आठवड्याला या दिवशी पाणी पुरवठा बंद