Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना दिलासा, ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:07 IST)
एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर गुरुवारी हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला. त्यामुळे वेळेवर वेतन न मिळाल्याने हवालदिल झालेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.
 
कोरोनामुळे लागलेले निर्बंध,रोडावलेली प्रवासी संख्या,इंधनाची दरवाढ आदी कारणांमुळे एसटी महामंडळ आर्थिक गाळात आहे.एसटी महामंडळ तोट्यात गेल्याने त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या वेतनावर झाला आहे.वेतन वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्‍यांसमोर आहे.वेतन मिळत नसल्याने कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत.
 
एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ६०० कोटी रुपयांची मदत मागितली होती.त्यावर अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत.त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचार्‍यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.
 
चालू आर्थिक वर्षासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत,असे निर्देश पवार यांनी दिले होते.निधी मिळाल्याने एसटी कर्मचार्‍यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments