महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला असून, उत्तीर्ण होण्यात मुलींची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. तर गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी 3 नंतर महाविद्यालयांमध्ये मिळणार आहेत.
विभागानुसार निकाल
कोकण – 95.3 टक्के
कोल्हापूर – 91.40 टक्के
पुणे-91.16 टक्के
औरंगाबाद- 89.86 टक्के
अमरावती- 89.92 टक्के
नागपूर-89.5 टक्के
लातूर-88.22 टक्के
नाशिक-88.22 टक्के
मुंबई 88.21 टक्के.
निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येतील
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourrusult.com
www.rediff.com/exams
http://jagranjosh.com/results
http://htcampus.com/results
बारावीचा निकाल मोबाइलवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मोबाइलवर निकाल
बीएसएनएल-धारकांनी MHHSC<space><seat no> असे टाइप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल प्राप्त होईल.
तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा मोबाइलधारकांनी MAH12 <space><Roll Number> असे टाइप करून 58888111 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल मिळू शकेल.