Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खासदार उदयनराजे यांनी चालवली रिक्षा

Rickshaw driven by MP Udayan खासदार उदयनराजे यांनी चालवली रिक्षा  Marathi Regional News In Webdunia Marathi
, मंगळवार, 1 मार्च 2022 (19:48 IST)
खासदार उदयनराजे आपल्या विशिष्ट शैली साठी ओळखले जातात. कधी ते पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात पडलेले दिसतात. तर कधी हटके स्टाईलमध्ये कॉलर उडवताना दिसतात. ते अलीकडील हवा येऊ द्या च्या मंचावर हवेतून एंट्री करताना दिसले. त्यावेळी त्यांनी पुष्पा चित्रपटाचे संवाद देखील बोलून दाखवले आहे. 
 
आता साताऱ्यात खासदार उदयनराजे यांनी चक्क तीनचाकी रिक्षा चालवली. आणि या रिक्षातून त्यांनीआपल्या निवासस्थानी  'जलमंदिर' परिसरात फेरफटका देखील लावला. 

खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने साताऱ्यात उदयनराजे मित्रमंडळ समूहाकडून रिक्षा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या रिक्षा चालकांपैकी विजेते रिक्षा चालकाच्या पाठीवर उदयन राजे यांनी शाबाशीची थाप दिली. एवढेच नाही तर या स्पर्धेत विजेता झालेल्या रिक्षाचालकाची रिक्षा चालवली. आणि आपल्या निवासस्थानी परिसरात फेरफटका देखील लावला. उदयनराजे यांनी रिक्षा चालवण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेगा ऑफर :नवीन मारुती अर्टिगा; दररोज फक्त 477 रुपये दराने घरी आणा