Publish Date: Tue, 14 Jul 2026 (09:35 IST)
Updated Date: Tue, 14 Jul 2026 (09:40 IST)
छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी व्हीआयपी विश्रामगृहातील जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या गेस्ट रूममधून रोकड आणि सोन्याची अंगठी चोरीला गेली. पोलिसांनी व्यवस्थापकाला अटक करून तपास सुरू केला आहे. सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्हीआयपी पाहुण्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या या चोरीमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ पी. एम. मिन्नू यांच्या पाहुण्यांसाठी राखीव असलेल्या खोलीतून रोकड आणि सोन्याची अंगठी चोरीला गेल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या कंत्राटी व्यवस्थापकाला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान पोलिसांनी चोरीची नोंद केली आहे. व पुढील तपास सुरु असल्याचे अधिकारींनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik