Marathi Biodata Maker

रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे

Webdunia
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (07:54 IST)
सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपकडून  ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून यासाठी नकार देण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर लक्ष देता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना या पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी एक पत्र लिहिले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "राज ठाकरेंनी स्वतःची स्टाईल जपली पाहिजे," असा टोला लगावला आहे.
 
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "अंधेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले, तेव्हा राज ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांना पत्र लिहले होते. पण पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकांवेळी त्यांनी पत्र लिहिले नाही. हा भेदभाव का करण्यात आला? हे फक्त तेच सांगू शकतात. त्यांचे भाषण आणि आधीच्या स्टाईलचा मीही चाहता आहे. पण सध्या त्यामध्ये आता कुठेतरी बदल होताना दिसतो. भाजपचा प्रभाव राज ठाकरेंवर पडत असून ही गोष्ट अनेकांना भावत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे. भाजपच्या नादी लागलेले पक्ष असो अथवा व्यक्ती दोन्ही संपले आहेत."
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील बेस्ट बस सेवा थांबली, कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

नायजरची राजधानी नियामे येथील विमानतळावर मोठा दहशतवादी हल्ला; ११ सैनिक, दोन नागरिक ठार

कार स्वस्त होणार, १५ जुलैपासून नियम लागू, टॅरिफ १० टक्क्यांवर येणार

फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी

फादर्स डे निमित्त वडिलांसोबत एक निवांत आणि आध्यात्मिक प्रवास, भेट द्या महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्री

पुढील लेख
Show comments