अलिबाग शहरात सुरू असलेल्या बाईक ऑन रेंट च्या व्यवसायिकांना पेण येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी नोटीस बजावली. सदर व्यवसाय बंद करण्याची सूचना या नोटीस ने दिल्या आहेत.
अलिबाग शहरात गेल्या काही महिन्यांपासून बाईक ऑन रेंट हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मात्र, बाईक ऑन रेंट या व्यवसायाविरोधात अलिबाग ऑटो रिक्षा व्यावसायिकांनी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली.
अलिबाग शहरात गेल्या काही महिन्यांपासून बाईक ऑन रेंट हा व्यवसाय सुरू झाला आहे. सदर दुकानात मोटारसायकल येणार्या पर्यटकांना भाड्याने दिली जातात. सदर व्यावसायिकांनी कुठूनही कसले परवानेसुद्धा काढलेले नसून सदरचा व्यवसाय हा आमच्या अनधिकृत असल्याचे रिक्षा चालक संघटनेने म्हटले होते..
या व्यवसायामुळे रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला असून, सद्यःस्थितीनुसार आम्हास आमचे कर्जसुद्धा फेडता येत नाही. एवढेच नव्हे तर, कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा भागविता येत नाही. तरी सदर प्रकारचे चालणारे अनधिकृत व्यवसाय आपल्यातर्फे पाहणी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून बंद करण्यात यावी, जेणे करून रिक्षा व्यवसाय व्यवस्थितपणे चालेल अशी मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पेण येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महेश देवकाते यांनी दिली.