Publish Date: Wed, 21 Dec 2016 (15:16 IST)
Updated Date: Wed, 21 Dec 2016 (15:20 IST)
कल्याणमध्ये नोट बदलून देण्याप्रकरणी एका बॅंक व्यवस्थापकासह बिल्डर आणि अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने दोन ठिकाणी सापळा रचून शिताफीने धरपकड केली. यांच्याकडून जवळपास 30 लाख 41 हजारांचा नोटा जप्त करण्यात आल्याचे समजते. केंद्राने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जुन्या नोटा बदलून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांनी जणू व्यवसायच सुरु केला असल्याचे दिसून येत आहे.