Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवरायांचा इतिहासावर ट्विटरवॉर : सचिन सावंत यांचा भाजपवर पलटवार

Chhatrapati Shivaji Maharaj history
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (14:23 IST)
भाजपनं काँग्रेसवर शिवरायांचा खोटा इतिहास टाकल्याचा दावा केला होता. आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपचा हा दावा खोडून काढत प्रत्युत्तर दिलं आहे. अशाने ट्विटरवॉर सुरु आहे. 
 
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करत यात शिवरायांची कन्या सकवारबाई यांच्याबाबत एक माहिती शेअर केली होती. तर, भाजपनं या ट्वीटवरुन महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या आहेत, असं म्हणत सचिन सावंत यांच्यावर टीका केली होती. आता सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार केला आणि इतिहासाचा दाखला दिला आहे.
 
सचिन सावंत यांनी ट्वीट केलं की 'भाजपाचा तोंड फोडणारा पुरावा हा पहा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपाने शिवरायांचा अवमान केला. माझी बदनामी केली. ‌अकलेचे तारे तोडल्याबद्दल @BJP4Maharashtra ने तात्काळ माफी मागावी. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'. 
 
त्यांनी एका पुस्तकाचा फोटोही जोडला आहे. शिवाजी महाराजांच्या एका पत्नीचे नावही सखवारबाई होते,' असा उल्लेख यात केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा जास्त घातक