Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सचिन वाझे यांना छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा त्रास,वैद्यकीय अहवाल दाखवा - एनआयए कोर्ट

सचिन वाझे यांना छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा त्रास,वैद्यकीय अहवाल दाखवा - एनआयए कोर्ट
, शनिवार, 3 एप्रिल 2021 (17:26 IST)
अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात असून त्यांना छातीत दुखणे आणि  हृदय विकाराचा त्रास होत असल्याचे  त्यांच्या वकिलाने अर्ज केले असताना कोर्टाने त्यांच्या कडून वैद्यकीय अहवाल मागविला आहे.  
 
एनआयए कोर्टाने मुंबई पोलिसांचे माजी अधिकारी सचिन वाझेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता की त्यांना छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा त्रास आहे. यानंतर एनआयए कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाझे  हे अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.त्यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत आज संपणार आहे.
 
सचिन वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी कोर्टाकडे अर्ज केला आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की छाती दुखण्यासह सचिन वाझे च्या हृदयात 90 टक्के ब्लॉकेज आहेत. म्हणून वाझे यांना त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञाशी भेट करून दिली पाहिजे. जेणेकरुन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होऊ शकेल.  वाझे  यांना आज एनआयए कोर्टात हजर केले जाणार तेव्हा वैद्यकीयअहवाल सादर करतील. 
 
संपूर्ण प्रकरण काय आहे?
25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ सापडली होती. या कारमधून 20 जिलेटीनच्या (विस्फोटक) कांड्या आढळल्या होत्या. तसेच धमकी देणारे पत्र देखील सापडले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या स्कार्पिओचा मालक मनसुख हिरेन असल्याचे समजले. परंतु त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी कार चोरी गेल्याचा अहवाल दाखल केला होता. 6 मार्च रोजी मनसुख हिरेनचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला. सुरुवातीला त्यास आत्महत्या म्हणायचा प्रयत्न झाला पण मनसुख हिरेनच्या पत्नीने त्यांच्यावर खुनाचा आरोप केला. नंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयए कडे सोपविण्यात आली.
13 मार्च रोजी एनआयएने मुंबई पोलिसांचे माजी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. मनसुख हिरेन खून आणि अँटिलिया प्रकरणात सचिन  वाझे यांची भूमिका समोर आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाम विधानसभा निवडणूक : भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मिळाल्याने गोंधळ, चार अधिकारी निलंबित